पिंपरी-चिंचवड नव नगर विकास प्राधिकरण

नागरिकांची सनद

माहिती अधिकार कायदा २००५ नुसार प्रसिद्ध करावयाची माहिती

४(१) ब I) प्राधिकरणाची माहिती, कार्य आणि कर्तव्ये

कार्यालयाचे नाव:- पिंपरी-चिंचवड नव नगर विकास प्राधिकरण.

पत्ता: पेठ क्र.२४ गंगानगर निगडी पुणे ४११०४४.

कार्यालय प्रमुख:- मुख्य कार्यकारी अधिकारी.

शासकीय विभागाचे नाव: नगर विकास विभाग , महाराष्ट्र शासन मंत्रालय, मुंबई ३२.

मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्त:- नगर विकास विभाग, कक्ष क्र.२२.

कार्यक्षेत्र:-

पिंपरी-चिंचवड नव नगरासाठी शासनाने पिंपरी चिंचवड औदहोगिक क्षेत्रा सभोवतालच्या मौजे भोसरी, मोशी, चिखली, निगडी,आकुर्डी, चिचवड, रावेत, वाकड, रहाटणी, थेरगाव या गावातील अधिसूचनेद्वारे संपादनाखालील क्षेत्र सुमारे २५८४ हेक्टर, प्रत्यक्ष ताब्यात मिळालेले क्षेत्र सुमारे १६२७ हेक्टर, ताब्यात न मिळालेले क्षेत्र सुमारे २११ हेक्टर.

भौगोलिक:-

पिंपरी चिचवड औद्योगिक क्षेत्रा सभोवतालच्या मौजे भोसरी, मोशी, चिखली, निगडी,आकुर्डी, चिचवड, रावेत, वाकड, रहाटणी, थेरगाव या गावातील संपादनाखालील जमिनी.

कार्यानुरूप:-

उपरोक्त क्षेत्रावर प्रधीकारानातर्फे तयार केलीली विकास योजना शासनाने मंजूर केलीली असून या विकास योजनेप्रमाणे या क्षेत्राची ४२ पेठांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक पेठेतील जमीन हि सुनियोजित नागरी सुविधांनी युक्त अशा भूखंड अभिन्यासात विभागाचे काम तसेच या भूखंडा अभिन्यासातील रस्ते, पाणी पुरवठा, मलनि:सरण आणि विद्युत पुरवठ्या संदर्भातील मुलभूत सोयी सुविधा निर्माण करण्याचे काम अधिनियमानुसार प्राधिकरणाने करावयाचे आहे. तसेच या भागात विविध व्यक्तींद्वारे केला जाणरा विकास, नियंत्रण नियमावलीनुसार नियंतरित करण्याचे काम प्राधिकरण करते.

विशिष्ठ कार्य:-

विभागाचे धेय्य / धोरण:-

महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम १९६६ कलम ११४ नुसार प्राधिकरणाचे उदिष्ट व कार्य स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामध्ये ताब्यात येणाऱ्या जमिनींवर सुनियोजित नगर बसविण्यासाठी भूखंड अभिन्यास तयार करणे, त्यास शासनाची मान्यता घेऊन अभिन्यासातील रस्ते, पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा, मलनि:सारण व्यवस्था इ. मुलभूत सुविधांची विकास कामे पूर्ण करणे आणि पूर्णपणे विकसित भूखंड वरील अधिनियमाची कलम ११८ नुसार ९९ वर्षाच्या भाडेपट्याने निवासी, व्यापारी, औदोगिक प्रयोजनासाठी वितरीत करणे.

धोरण:-

सर्व सामान्य नागारीक तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील औद्योगिक कामगारांसाठी सर्व सुविधांनी युक्त नवनगर उभारणी करणे.

सर्व संबधित कर्मचारी :-

स्वतंत्र परीशिष्ठादवारे कर्मचाऱ्यांची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

कार्य:-

महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम १९६६ कलम ११४ मध्ये स्पष्ट केलेली कामे.

कामाचे विस्तृत स्वरूप:-

संपादित जमिनींचे विभाग व पेठ निहाय नकाशा / रेखांकाने तयार करणे, भूखंड अभिन्यास तयार करून पेठ निहाय मुलभूत सुविधांची कामे उदा. रस्ते, भूमिगत गटारे, पाणीपुरवठा, नलिका आणि विद्युत पुरवठ्याची सोय निर्माण करणे आणि भूखंडाची भाडेपट्याने विक्री करून नवनगर बसविणे.

माल्मत्तेचा तपशील- जागेचा तपशील:-

प्राधिकरणाच्या संपादनाखालील सुमारे २५८४ हेक्टर इतके क्षेत्र आहे. या क्षेत्रातील सर्व विकास नियंत्रण आणि ताब्यात आलेल्या परंतु भाडेपट्याद्वारे वितरीत न झालेले विकसनशील क्षेत्र या शिवाय प्राधिकरण कार्यालयाच्या इमारती व्यतिरिक्त पेठ क्र २४ येथील जुने कार्यालय, सिमेंट गोडाऊन पेठ क्र २५ येथील सांस्कृतिक भवन या अन्य इमारती प्राधिकरणाच्या मालकीच्या आहेत.

उपलब्ध सेवा :-

प्रधीकाराण्यातर्फे मुलभूत सोई सुविधांनी युक्त असलेले निवासी, व्यापारी, औद्योगिक भूखंड ९९ वर्ष भाडेपट्याने करून दिले जातात.

संस्थेच्या संरचनात्मक तक्त्यामध्ये कार्यक्षेत्राचे प्रत्येक स्तरावरचे तपशील :-

या संदर्भातील एकूण ४२ पेठांची रेखांकाने सोबत परीशिष्ठामध्ये जाहीर केलीली आहेत. (सर्व पेठांचे नकाशे वेबसाईटवर पहावयास उपलब्ध आहेत)

कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक व वेळा:-

०२०-२७६७६५२९३४/३५, ०२०-२७६५४१०३ कार्यालयीन वेळ सकाळी १०.०० ते सायं. ०५.४५

साप्ताहिक सुट्टी व विशिष्ठ सेवेसाठी ठरवलेल्या वेळा:-

महिन्यातील दुसरा व चौथा शनिवार व सर्व रविवार, सर्व शासकीय सुट्ट्या, शिवाय विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या स्थानिक सुटट्या.

४(१) ब II) अधिकाऱ्यांची अधिकार व कर्तव्ये:-

पिंपरी-चिंचवड नव नगर विकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या विभागांपेकी माहिती व विक्री विभाग व नियोजन विभाग यांच्या कामकाजाबाबत शासनाने अनुक्रमे भुवाटप नियम १९७३ तसेच विकास नियंत्रण नियमावली १९७३ मंजूर केलीली आहे. या नियमाप्रमाणे वरील दोन विभागांचे कामकाज चालते. तथापि आस्थापनेवरील लेखा विभाग, अभियांत्रिकी विभाग यांचे कामकाजाबाबत प्राधिकरणाने महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम १९६६ कलम १५९ नुसार लेखा संहिता तयार करून शासनाचे मान्यतेसाठी पाठविली असून त्यास दिनांक २५/०६/२००९ रोजी शासनाची मान्यता मिळालेली आहे. प्राधिकरणाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी लेखा शाखेतर्फे प्राधिकरण लेखा संहिता व शासनाने वेळोवेळी केलेले वित्तीय नियम वापरण्यात येतात. आणि अभियांत्रिकी विभागातील कामकाजासाठी लेखा कार्यरत मुख्य कार्यकारी अधिकारी या पदास मात्र महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम १९६६ कलम १५२(४) नुसार निश्चित केलेल्या कलमाने वैधनिक अधिकार असून या व्यतरिक्त सर्व अधिकार प्राधिकरण समितीस असल्याने प्रधाकरनातील सर्व निर्णय प्राधिकरण समितीस असल्याने प्राधिकरणातील सर्व निर्णय प्राधिकरण समितीच्या मान्यतेने अमलात आणले जातात.

४(१) ब III) निर्णयाबाबतची कार्यपद्धती:-

प्राधिकरणातील विविध विभागांचे कामकाज सुरळीतपणे चालण्यासाठी ४(१) ब II प्रमाणे विविध नियामावल्यांमध्ये स्पष्ट केलेल्या कार्यापद्धतीनुसार अंतिम निर्णय प्राधिकरण सभेमध्ये करण्यात येतात. नियमावलीतील कार्यपद्धतीचे नुसार व प्राधिकरण सभेने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार निर्णय प्रक्रिया होत असते. याबाबत विविध विभागातील अधिकारी , यांचे प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करतात आणि मुख्य कार्यकारी अधीकार्यांच्या निर्णयानुसार प्रत्येक्ष अंमलबजावणी होत असते.

४(१) ब IV) कर्तव्यपूर्ती निश्चित केलेले निकष:-

पिंपरी चिचवड प्राधिकरण संस्थेचे नवनगर उभरणीचे काम पूर्ण करणेसाठी निश्चित केलेल्या कार्यक्षेत्रातील जमिनीचे संपादनातील निकष हे भूसंपण प्रक्रियेशी सलग्न आहेत. संपादन पूर्ण होवून जमिनीचे ताबे प्राधिकरणास मिळतात. ताबे मिळाल्यावर विविध पेठांचे रेखांकन करून नगररचणा विभागकडील निकषानुसार त्यावर विविध आरक्षणे निश्चित करून भूखंडांचे अभिन्यास तयार केले जातात. रस्ते, पाणी पुरवठा मलनि:सारण व्यवस्था आणि विद्युत पुरवठा अशी मुलभूत सुविधांची कामे सुरु केल्याशिवाय भूखंड विक्री प्रस्तावित करता येत नाही. एकूण सुविधा दिल्यावर पेठ/भूखंडाची किंमत निश्चित केली जाते. ती प्रत्येक वर्षी १ एप्रिल रोजी जाहीर होते. तद्नंतर भूखंड विक्रीचे धोरण जाहीर होते. तद्नंतर भूखंड विक्रीचे धोरण जाहीर करून भूवाटप नियमातील तरतुदीप्रमाणे विक्री होते. मागणीप्रमाणे विक्री होत असल्याने त्यासाठी विशिष्ठ काळ मर्यादित कामाबाबत उद्दिष्टे ठरविण्यात येत नाहीत. भूखंड विक्री/वाटप केलेवर प्रधीकरनाची विकास नियंत्रण नियमावलीनुसार बांधकाम परवानगी दिली जाते. सदरचे नियम जाहीर करणेत आले आहेत, त्यानुसार त्यातील सर्व निकष लागू करणेत आले आहेत. प्रधीकरनच्या अभिन्यासातील २४ मीटर, ३१ मीटर आणि ४५ मीटर रुंद रस्त्यांचे उच्च दर्ज्याचे डांबरीकरण करणे तसेच अंतर्गत खडी मुरुमाचे रस्ते डांबरीकरण करून देणे. आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूस पाणी पुरवठा वाहिन्या मलनी:सारण वाहिन्या इ. कामे करणे अशा रीतीने कामांचा दर्जा उचाव्ण्याबाबत शासन नियमावलीनुसार धोरणात्मक निर्णय घेवून प्राधिकरण सभेद्वारे मानके निश्चित करण्यात येतात.

४ (१) V) प्राधिकरण कामाशी संबाधित कायदे, नियम, शासन निर्णय इ.

पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे संपूर्ण कामकाज महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचणा अधिनियम १९६६ भाग ६ कलम ते १५९ नुसार चालते. तसेच कामाच्या स्वरूपाप्रमाणे प्राधिकरनास या अधिनियमाच्या भाग ३ व ४ चे अंतर्गत असलेल्या कलमानुसार कामकाज करण्याचे अधिकार आहेत.

प्राधिकरणातील अन्य विभागाचे कामकाज पुढे नमूद केलेल्या नियामांप्रमाणे करण्यात येते.
 • जनसंपर्क विभाग:- सभा संचालनाचे शासनाने मंजूर केलेल्या नियम.
 • माहिती विक्री विभाग :- भूवाटप नियम १९७३.
 • अभियांत्रिकी विभाग:- सार्वजनिक बांधकाम विभाग व जीवन प्रधीकारानाकडील नियमावली.
 • विद्युत विभाग:- इंडियन इलेक्ट्रिसिटी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग.
 • लेखा विभाग:- महाराष्ट्र राज्याचे वित्तीय नियम.
 • प्रशासन विभाग:- महाराष्ट्र नागरी सेवा नियम.
 • अतिक्रमण विभाग:- महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम १९६६ कलम ५२,५३,५४,५५ आणि कलम १४२.

४(१) VI प्राधिकरणाचे कार्यालयातील दस्तएव्जांची माहिती:

पिंपरी चिंचवड प्राधिकरणाकडे खालील प्रकारची कागदपत्रे असतात.

 • मूळ विकास योजनेचा शासनमान्य नकाशा.
 • विविध पेठांचे शासनमान्य नकाशे.
 • प्राधिकरण सभेचे इतिवृत्तांत.
 • प्राधिकरण तांत्रिक समितीचे इतिवृत्तांत.
 • विविध प्रयोजनाच्या( निवासी, व्यापारी, औद्योगिक) भूखंडाचे भाडेपटटे.
 • सदर भूखंडावर केलेल्या बांधकामाबाबतचे नकाशे, बांधकाम परवाने, पूर्णत्व दाखले इ.
 • विविध पेठांचे अभिन्यासातील भूखंडाचे मोजणीचे अभिलेख तसेच प्राधिकरणाच्या ताब्यात मिळालेल्या जमिनींचे संयुक्त मोजणी पत्रके.
 • प्राधिकरणाच्या संपाद्नाखालील जमिनीबाबत भूसंपादन कायदा कलम ४, अधिसूचना कायदा कलम ६, उद्घोषणा कायदा कलम ११, निवाडा कायदा कलम १६ अथवा ४७ नुसार ताब्याचे अभिलेख (पंचनामा ताबे पावत्या) प्राधिकरणाच्या नावे ७/१२ उतारे आणि त्याचे फेरफार.

४ (१) ब VII प्राधीकाराणाची धोरणे / निर्णय ठरवण्यासाठी जनसामान्यांशी सल्लामसलतीबाबत तरतूद:

पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधीकाराणास लागू असलेल्या महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम १९६६ च्या तरतुदीप्रमाणे प्राधिकरण विकास योजना तयार करून अथवा त्यातील बदलाबाबत कायदेशीर तरतुदीनुसार जाहिरात प्रसिद्ध करते. अशा जाहिरातीस सुनावणी देण्यात येते आणि नंतरच विकास योजनेतील विविध प्रयोजनांची आरक्षणे अथवा बदल शासनाच्या मान्यतेने कायम केले जातात. इतर प्रशासकीय कामे हि शासन मान्य भू-वाटप नियम, बांधकाम नियमावली तसेच शासन निर्णयानुसार चालतात. प्राधिकरण समितीवर स्थानिक लोक प्रतीनीधीत्व अथवा सल्लामसलतीची नियुक्ती शासन करत असल्याने जनसामान्यांसाठी वेगळे प्रतीनीधीत्व अथवा सल्लामसलतीची तरतूद नाही.

४ (१) ब VIII प्राधीकाराण कामकाजाबाबत विविध समित्यांची नावे आणि त्यांचे इतिवृताबाबत:

प्राधिकरण समितीच्या सदस्यांची यादी

 • विभागीय आयुक्त, पुणे- अध्यक्ष प्राधिकरण.
 • जिल्हाधिकारी, पुणे- उपध्यक्ष प्राधिकरण.
 • उपसंचालक, नगररचना, पुणे. सदस्य.
 • अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पुणे विभाग, पुणे सदस्य.
 • शहर अभियंता, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, पुणे सदस्य.
 • उपसंचालक, नगररचना, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, पुणे सदस्य.
 • मुख्य कार्यकारी अधिकारी, विकास प्राधिकरण. सदस्य सचिव.

४(१) ब IX आणि X अधिकारी/ कर्मचाऱ्याची सूची

प्राधीकरणात कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांची यादी वेतनासह स्वतंत्र प्रकाशित करण्यात आली आहे. प्राधिकरणातील कर्मचार्यांना महाराष्ट्र शासन वेतन नियमानुसार वेतन अदा करण्यात येते.

४ (१) ब XI विविध कामांसाठी अंधाजपत्रकीय तरतूद व खर्चाबाबत माहिती

पिंपरी चिंचवड विकास प्राधीकाराणाचे कार्यक्षेत्रात अधिनिनियामातील उधिष्टाप्रमाणे मुलभूत सुविधांच्या उदा. रस्तेबांधणी, पाणी पुरवठा जलवाहिन्या, मलनि:सारण वाहिन्या आणि विद्युत पुरवाठ्यांची व्यवस्था या प्रमुख सुविधांवर रक्कम खर्च करण्यात येते. प्रतिवर्षी अंदाजपत्रक जाहीर केले जाते त्यात वरील बाबतची खर्चाची तरतूद नमूद केलेली असते. प्रादिकारानाच्या अंदाजपत्रकाचा तपशील स्वतंत्रपणे वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आला आहे.

४ (१) ब XII आणि XIII कार्यालयीन अनुवाद वाटपाबाबत माहिती

प्राधिकरण क्षेत्रातील जमिनींचे वाटप आणि त्यावरील विकासाचे नियंत्रण हे शासनमान्य नियमानुसार व प्राधिकरण सभेने ठरविलेल्या धोरणानुसार करण्यात येते त्यामुळे या नियमाव्यतिरिक्त कोणतीही सवलत परवानगी अथवा प्राधिकार देण्यात येत नाही. तसेच पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधीकारानातर्पे अनुदानाचा कोणताही कार्यकम राबविण्यात येत नाही. त्यामुळे अशा अनुदानाने लाभार्थी नाहीत. तथापि प्राधिकरण क्षेत्रात शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मोदय संस्थाना प्रचलित निवासी दरापेक्षा कमी दराने प्रकरणाचे गुणवत्तेनुसार जागेचे वाटप करण्यात येते. अशा प्राधिकरण क्षेत्रातील भाडेपट्टाधारक शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मोदय संस्थाना तपशील स्वतंत्ररित्या प्रकाशित करण्यात येतो.

४ (१) ब XIV कार्यालयातील माहिती संगणकीकृत स्वरूपात प्रकाशित करणेबाबत

पिंपरी चिंचवड प्राधीकारानाच्या कामकाजाचे संगणकीकरानामध्ये नकाशाचे संगणकीकरण करणेचे काम चालू आहे. इतर कामकाजाशी सबंधीत अभिलेखे संगणकीय नोंदीच्या स्वरुपात उपलब्ध नाहीत. तथापी प्राधीकाराणाची वेबसाईट कार्यान्वित असून प्राधिकरणाची सविस्तर माहिती www.pcntda.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

४ (१) ब XVI कार्यालयातील माहिती नागरिकांना उपलब्ध होण्यासाठी पुरविण्यात आलेल्या सुविधांबाबत

प्राधिकरण कार्यालयात विविध योजना व धोरणे यांची माहिती कार्यालयीन वेळेत नागरिकांना उपलब्ध होण्यासाठी जनसंपर्क व प्रसिद्धी अधिकारी हे पद आस्थापानेवर कार्यरत आहे. यांचेमार्फत वरील माहिती नागरिकांना देण्यात येते तसेच प्राधिकरनातील गृह योजना, सदनिका, भूखंड संदर्भातील माहितीसाठी माहिती व विक्री अधिकारी हे पद कार्यरत आहे. या व्यतिरिक्त अन्य सर्व आवश्यक माहिती उदा. अर्जाचे नमुने, जाहीराती, रेखांकने, भेटींच्या वेळा इ. सूचना फलकावर लावलेली असते. तसेच प्राधीकारानाची वेब साईट उपलब्ध असून त्याचे संकेत स्थळ – www.pcntda.org.in असे आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी पिंपरी चिचवड प्राधिकरण कार्यालयात एक खिडकी योजना कार्यरत असून त्याचा तपशील अभ्यागत माहिती पुस्तिकेत उपलब्ध आहे. कार्यालयातर्फे प्रामुख्याने करण्यात येणारी नागरिकांच्या सोयीची कामे खालील प्रमाणे निश्चित करण्यात आली असून या कामांसाठी अर्जाचे तारखेपासून निर्णयाचा विहित कालावधी निश्चित केला आहे. तो पुढील प्रमाणे.

एक खिडकी योजनेसाठी तयार करण्यात आलेली माहिती पुस्तिका कार्यालयात उपलब्ध आहे.

अ. क्र. अर्जाचा विषय निर्णयाचा विहित कालवधी
1 बांधकाम परवानगी ६० दिवस
2 बांधकाम पूर्णत्व दाखला. ३० दिवस
बांधकाम सुरक्षा ठेव परतावा. ३० दिवस
कर्जासाठी ना हरकत दाखला २१ दिवस
पांच वर्षापुढील मिळकत हस्तांतारणे ४० दिवस
पांच वर्षाचे आतील मिळकत हस्तांतारणे ४५ दिवस
वारसाचे नाव मिळकतीस लावणे. ३० दिवस
कुटुंबातील व्यक्तीचे नाव लावणे. ३० दिवस
१२.५ टक्के जमीन परतावा वाटप (कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर) ४५ दिवस
१० १२.५ टक्के जमीन परतावा हस्तांतारण ३० दिवस
११ १२.५ टक्के जमीन वाटपमधील बांधकामाचे कर्जासाठी नाहरकत दाखला २१ दिवस