विभाग :- नियोजन विभाग
1) विभाग प्रमुखाचे नाव | श्री.सं. वि. कांबळे |
2) पदनाम | मुख्य रचनाकार(अतिरिक्त कार्यभार) |
3) ई-मेल | cp@pcntda.org.in |
4) संपर्कक्रमांक | ०२०-२७१६६०००,०२०-२७१६६००५ Ext.No. १५०१ |
विभागातील कामे :-
प्राधिकरण क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास होण्यासाठी संपादनाखाली असलेल्या क्षेत्राचे 1 ते 42 सेक्टर व 4 मध्यवर्ती सुविधा केंद्र यामध्ये नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक सेक्टर चे क्षेत्र साधारणत: 40 ते 50 हेक्टर इतके आहे.
प्राधिकरणाचे नियोजन विभागाकडून खालीलप्रमाणे कामे केली जातात -
नियोजन विभाग
- प्राधिकरणाच्या विकास योजनेनुसार पेठांचे अभिन्यास तयार करुन मा. संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांची महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 115 नुसार मान्यता घेणे.
- विकास योजनेमध्ये झालेल्या बदलाच्या दृष्टीने महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 37 अन्वये प्रस्ताव तयार करुन त्याबाबत वैधानिक कार्यवाही पूर्ण करुन प्रस्ताव शासन मान्यतेस सादर करणे.
- प्राधिकरणाच्या विकास योजना दुसऱ्यांदा सुधारीत करणेबाबत कामकाज पहाणे
- अतिक्रमण प्रकरणात झोनल अधिकारी यांनी अपेक्षिलेल्या माहितीबाबत मार्गदर्शन करणे व अभिप्राय देणे.
अ .तांत्रिक शाखा
- रेड झोनबाबतचे अभिप्राय देणे तसेच नकाशे तयार करणे .
- प्राधिकरणाच्या विकास योजनेनुसार भाग नकाशे व झोन दाखले देणे .
- बांधकाम परवानगी / पूर्णत्व नकाशांच्या सत्यप्रती संबंधितांना उपलब्ध करून देणे , तसेच गृहयोजनेतील नकाशे उपलब्ध करून देणे .
- विविध पेठांची रेखांकने तयार / सुधारीत करणे .
- विकास योजनेनुसार अभिप्राय देणे .
- भू विभागाकडून प्राप्त झालेल्या भूखंड /गाळा हस्तांतरण प्रकरणी जागा पहाणी करून अनधिकृत बांधकामाबाबत अभिप्राय देणे .
- या कार्यालयामार्फत राबविलेल्या गृहयोजना ,पेठांचे नकाशे ,बांधकाम परवानगी / पूर्णत्व दाखले ,मंजूर बांधकाम नकाशे इत्यादींच्या सत्यप्रती देणे .
ब .रेखाकला शाखा
- रेखांकनाप्रमाणे निवासी , १२.५% भूखंड ,विविध आरक्षणामधील भूखंडाचे जागेवर भूविभागाचे मागणी प्रमाणे प्रत्यक्ष जागेवर सीमांकन करणे .
- सीमांकन झाल्यानंतर प्लेन टेबल शीट तयार करून त्याचे सीमांकन प्रमाणपत्र तयार करणे .
- पेठ निहाय ,भूखंड निहाय ,क्षेत्र नोंदी व भूखंड क्रं. वसलेवार पुस्तकात नोंदी घेणे .
- अतिक्रमण विभाग व क्षेत्रीय अधिकारी यांना प्रत्यक्ष जागेवरील सर्व्हे नंबर निहाय व पेठ निहाय हद्दी दाखवणे .
- अभियांत्रिकी विभागास रस्ते तसेच खुल्या जागांचे रेखांकन नकाशाप्रमाणे सीमांकन देणे .
- भूखंड धारकास भाडेपट्टा नोंदविण्यापूर्वी प्रत्यक्ष जागेवर भूविभागाने कळविलेस जागा ताब्यात देणे .
- जोते तपासणी करणे
- भू विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपातील भाडे करारावर देणेत येणाऱ्या जागांचे संबंधितांना भू विभागाचे पत्रानुसार जागा ताब्यात देणे व पुन्हा ताब्यात घेणे
क .सर्व्हे शाखा
अनु. क्र. | अधिकारी / कर्मचाऱ्यांचे नाव | पदनाम |
---|---|---|
१ | >श्री.सं. वि. कांबळे | मुख्य रचनाकार(अतिरिक्त कार्यभार) |
२ | श्री पी.जे. थोरात | नगर रचनाकार |
३ | श्री धीरज प्रभू | सहाय्यक नगर रचनाकार |
४ | श्रीमती प्रियंका रावसाहेब गायधनी | सहाय्यक नगर रचनाकार |
५ | श्रीमती रेखा बोरुडे | सहाय्यक लेखाधिकारी |
६ | श्री विठ्ठल गायकवाड | कानिष्ठ अभियंता (स्थापत्य )मुख्य आरेखक (अतिरिक्त कार्यभार) |
७ | श्री विकास वाघमारे | कानिष्ठ अभियंता (स्थापत्य )प्रमुख भुमापक (अतिरिक्त कार्यभार) |
८ | श्री सुनिल शेगर | रचना / नियोजन सहाय्यक परीक्षा भुमापक (अतिरिक्त कार्यभार) |
९ | श्री विश्वनाथ क्षिरसागर | कानिष्ठ अभियंता (स्थापत्य ) भुमापक (अतिरिक्त कार्यभार) |
१० | श्रीमती उषा विशावासराव | नियोजन सहाय्यक |
११ | श्री सत्येन शहारे | कनिष्ठ लिपिक |
१२ | श्री नाना कांबळे | नाईक |
१३ | श्री महिपती गोपाळे | मजदूर |
१४ | श्री सुदाम केंजळे | मजदूर |
१५ | श्री अंकुश हेंबाडे | मजदूर |
१६ | श्री प्रकाश ढोरे | मजदूर |